Monday, 27 July 2020

"माझ्यासाठी तू................................."

"माझ्यासाठी तू................................."


माझ्यासाठी तू,
निष्प्राण देहातील, जीवनाची चेतना,

माझ्यासाठी तू,
घनदाट तिमिरातील, आशेचा एकमेव प्रज्वलित दीप,

माझ्यासाठी तू,
थांबलेल्या लेखणीची, आंतरिक प्रेरणा,

माझ्यासाठी तू,
बेसूर जीवनातील, कृष्णाच्या बसुरीची फुंकर,

माझ्यासाठी तू,
बंदिवान स्त्रियांचा, तारणहार सखा कृष्ण,

माझ्यासाठी तू,
जीवनाच्या पुस्तकातील, वाचत रहावसं वाटणारा अध्याय,

माझ्यासाठी तू,
थकलेल्या मनाला, आधाराचा भक्कम खांदा,

माझ्यासाठी तू,
अथांग गूढ गहिऱ्या डोहातील, आनंद तरंग, आनंद तरंग.....

- आनंदी
२१ नोव्हेंबर २०१८

कलियुगी पुंडलीक

माझे सासर पंढरी ||

आहे मुळा-मुठेच्या तीरी,
बाप आणि आई, माझे मामा अन सासुबाई,
माझे सासर पंढरी ||

मेव्हणा राहे एकमेव बंधु, 
सख्या बंधुंस विसरणीस टांगू, 
माझे सासर पंढरी ||

माझ्या बहिणी मेव्हण्या, नाही त्या मज पाहुण्या,
माझे सासर पंढरी ||

फेकुनी जन्मदात्यांस वीट, सासुरवाडीचा मी पुंडलीक,
माझे सासर पंढरी ||

भार्येचरणी मी शरण, ना काढी मी माहेरची आठवण,
माझे सासर पंढरी ||

सणसुद, शनि-एतवारी, न चुके सासुरवाडीची वारी,
माझे सासर पंढरी ||

होऊन कणाहीन पडीन, पण सासुरवाडीस राहीन,
माझे सासर पंढरी ||

- रचना २४/०६/२०२०

Thursday, 28 March 2013

तू भेट असा सख्या रे


तू भेट असा सख्या रे


हे जीवना तुजसवे असे जुळावे नाते,
मायेच्या मातीसंगे गर्भातील अंकुराचे,
नकोस फक्त मित्र, नकोस फक्त सखा,
गर्भांकुर बनुनी माझ्या गर्भात तू रुजावा,

माझ्यातील माझ्यामध्ये तू एक होऊनी रहावा,
हरएक क्षण तुझ्या अंकुरण्याचा मी अंतरी जपावा,

माझे श्वास तुझे श्वास, दोघांच्या हृदयाचे ठोके,
असे संगीत ते उपजावे, अवघे जगणे गाणे व्हावे,

ना हिरावेल तुज कोणीही, ना पडेल कधी मनी अंतर,
तुटता अखंडित होई असे, जडो  नाते नाळेचे सुंदर,

आईची थोरवी जी प्रियसीत नसे मुळात,
गुणावगुणासह तुज जीवना, घेईन मी पदरात,

तू भेट असा सख्या रे, भेटशील पुन्हा तू जेव्हा,
नाळेचे घेउनी नाते, या गर्भात घे विसावा.

 रचना 

Friday, 25 January 2013

शब्द


 शब्द 

जितनेभी कम शब्द कहे आपने,
बस शहदकी मिठासही थी,
जिंदगीकी मिठीसी मिठास मेरी यु नं गुम करो,
चाहे कुछभी करो, पर अपनी खामोशिसे मुझे मत मारो,

शब्दोंको आपके मैने सर आंखोंसे लगाया,
नं गिरने दिया जमींपे, झट हथेली पे संभाला,
मेरे आंचल से उन्हे छुडाकर, नं मेरी गोद यु सुनी करो,
चाहे कुछभी करो, पर अपनी खामोशिसे मुझे मत मारो,

शब्दही है आपके मेरा दशेहरा दिवाली,
शब्दही है आपके मेरा कर्म मेरी पूजा,
ईश्वर और भक्त के बीच नं यु दिवार खडी करो,
चाहे कुछभी करो, पर अपनी खामोशिसे मुझे मत मारो!!


- हरीप्रिया

Friday, 2 December 2011

ऐ जिंदगी!

जब तुम्हारा जिक्र हुवा ऐ जिंदगी
सामनेवालेने पुछा "कौन है यह जिंदगी"?
"जानना चाहते हो?" कह्के मैने कहा,

"तुम जो हो वो है जिंदगी,
तुम्हारे सामने जो मै हू खड़ी वो है जिंदगी,
हरएक चेहरेमें नजर आऐ जो वो है जिंदगी,
मासूम मुस्कुराहट में खिलखिले जो वो है जिंदगी,

पत्तोंमे लेहरा रही है वो है जिंदगी,
फुलोंमें महक रही है वो है जिंदगी,
हवासे मुझे छु रही है वो है जिंदगी,
उजाले की पहली किरण है जिंदगी,

फैली हुई बाहोंमे समायी  ना समाये वो है जिंदगी,
और नन्ही बाहोंमे पलमे सिमट आऐ एैसी है जिंदगी,
तेरी मेरी अच्छाईयोंमें शामिल है जिंदगी,
कहीभी ना होते हुए भी, हर शय मै मौजूद है जिंदगी,

सांसोसे लेकर हृदयतक पोहंचे वो है जिंदगी,
मै उसकी कुछभी नही पर, मेरा सबकुछ है जिंदगी,
मरना आसान है पर मुश्कील है जिंदगी,
इसीलिए तो मेरी मंजिल है जिंदगी."